Sunday, August 26, 2018

चित्रकला ग्रेड परीक्षा तयारी

चित्रकला ग्रेड परीक्षा विषय

एलिमेंटरी चित्रकला परीक्षेला विषय असतात.

वस्तूचित्र
स्मरणचित्र
संकल्पचित्र
कर्तव्य भूमिती अक्षरलेखन

निसर्गचित्र मुक्तहस्तचित्र हे विषय शासनाने २०१५ पासून काढून टाकले आहेत

चित्रकला ग्रेड परीक्षा तयारी

स्मरणचित्र

या विषयात माणसे माणसांच्यामधील परस्पर आंतरक्रिया (interactions) यांचे चित्रण अपेक्षित असते. हे चित्रण विद्यार्थ्याचे पूर्वानुभव निरीक्षण यांच्या स्मरणातून करावयाचे असल्याने यास स्मरणचित्र असे म्हटले जाते

स्मरणचित्र काढताना आपल्याला काय व्यक्त करायचे आहे त्याचे सादरीकरण फार महत्वाचे असते

जसे आपण एखाद्या विषयावर भाषण करायचे असल्यास मुख्य मुद्याला जास्तीत जास्त वेळ देणे, उपलब्ध वेळ लक्षात घेऊन विषयाच्या बारकाव्यात किती शिरायचे हे ठरवणे, स्पष्ट शब्दोच्चार, समोरच्यांना ऐकू जाईल इतका मोठा आवाज, पण कानठळ्या बसणार नाहीत अशा बेताने बोलणे, योग्य त्या शब्दांवर जोर देणे, भाषण नीरस, कंटाळवाणे वाटू देणे या गोष्टी महत्वाच्या असतात, चित्रातही याच गोष्टी पण दृक माध्यमातून असतात.

चित्रातील मुख्य विषयाला किंवा घटकाला कागदावरील जास्तीत जास्त महत्त्वाची जागा देणे. बारकावे किती दाखवायचे हे चित्र एकूण किती वेळात काढायचे आहे त्यावर अवलंबून असते. एलिमेंटरी परीक्षेत तास वेळ असतो. त्यामुळे काही प्रमाणात बारकावे चित्रित करता येतात.

स्मरणचित्रात काय करावे आणि काय टाळावे?

. मनुष्याकृती काढताना माणसांच्या हालचाली जिवंतपणा दाखवावा.
स्तब्ध मनुष्याकृती टाळाव्यात.

. कोणताही विषय असला तरीही समोरून तसेच पाठमोरी माणसे कधीही काढू नका. मनुष्याकृती बाजूने म्हणजे आपल्याशी काटकोनात किंवा लघुकोनात वा विशालकोनात दाखवाव्यात.

. कागदाच्या मध्यभागी मुख्य विषय आला पाहिजे. सर्व मुख्य मनुष्याकृती कागदाच्या मध्यबिंदूकडे म्हणजेच विषयाकडे तोंड केलेल्या असाव्यात.

. कागदाच्या साधारण मध्यावर एक आडवी रेषा पूर्ण लांबीची काढल्यास त्या रेषेच्या खालचा अर्धा कागद ही चित्रातील जमीन कल्पावी. वरचा भाग हे आकाश. त्या जमिनीचे आडवे तीन समान भाग कल्पावेत. यातील सर्वात खालचा एक तृतीयांश भाग म्हणजे जवळची जमीन (foreground). 

त्या वरची मधली जमीन (middle ground) 

आणि त्याही वरचा एक तृतीयांश भाग ही दूरची जमीन (background) समजावी

आपल्या दृश्यात जवळच्या जमिनीवरील माणसे, वस्तू ह्या मोठ्या काढाव्यात. दूरच्या जमिनीवरील माणसे, वस्तू ह्या लहान दिसणे आवश्यक आहे. याला यथार्थदर्शन (perspective) म्हणतात.  

. कोणत्याही चित्रात आधी काय आणि मग काय काढावे याला फार महत्त्व असते. नेहमी जवळच्या म्हणजेच विषयातील मुख्य मनुष्याकृती आधी काढाव्यात. दूरच्या कमी महत्वाच्या वस्तू, माणसे कधीही आधी काढू नयेत.

. चित्रातील प्रत्येक माणूस तळपायापर्यंत दिसणे आवश्यक नसते. मुख्य विषय जवळून दाखवताना काहींचे पाय कागदाबाहेर जाऊ शकतात. तसेच चित्रातील प्रत्येक मनुष्याकृती संपूर्ण दिसणे आवश्यक नसते. विषयानुसार दूरच्या मनुष्याकृती जवळच्या मनुष्याकृतींनी अंशतः आच्छादित होऊ शकतात. किंबहुना तसे जाणीवपूर्वक करावे.

. ह्या परीक्षेत चित्रातील माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव इतर बारकावे यांना फार महत्व नाही. माणसांची हालचाल देहबोली दाखवणे आवश्यक आहे. किंबहुना चेहऱ्याचा कोन, बाह्यरेषा चांगल्या काढल्या असल्यास नाक डोळे नाही काढले तरी चालेल.

. पेन्सिलने हलक्या हाताने काढावे. पेन्सिलचा वापर कमीत कमी करावा. रबराचा वापर तर कटाक्षाने पूर्णपणे टाळावा२५ मिनिटात पेन्सिलने चित्र काढणे संपले पाहिजे. अन्यथा वेळ पुरणार नाही.

. पिवळा केशरी हे सर्वात भडक रंग आहेत. ते मुख्य मनुष्याकृतींना किंवा वस्तूंना द्यावेत. पण पार्श्वभूमीला कधीही देऊ नयेत. दिलेल्या वेळेत चित्र पूर्ण व्हावे. तथापि  वेळेअभावी रंगकाम थोडे अपूर्ण राहिल्यास त्याबद्दल फार गुण कापले जात नाहीत. जे काम केले आहे ते काय दर्जाचे केले आहे ते पाहिले जाते, हे लक्षात असू द्यावे.

१०. स्मरणचित्राचा पायाभूत सराव करण्यासाठी प्रत्यक्ष रेखाटन (live sketching) म्हणजे समोर माणसे पाहून त्यांचे रेखाटन करावे. बाजारात ग्रेड परीक्षा तयारीसाठी मिळणाऱ्या पुस्तकांचा वापर स्मरणचित्रासाठी चुकूनही करू नये. त्यात प्रौढ व्यक्तींनी आपले असले-नसलेले कौशल्य पणाला लावून वेळेचे कोणतेही बंधन पाळता मुलांच्या क्षमतांचा विचार करता अतिशय निकृष्ट चित्रे काढलेली असतात. ती पाहून मुलांची दिशाभूल होते.

परीक्षक तुमच्या चित्रात साधारणपणे खालील बाबी आहेत का पाहतात.

. प्रमाणबद्धता

. मनुष्याकृतीतील जिवंतपणा, हालचाली कोन.

. यथार्थदर्शन

. सुयोग्य मांडणी अवकाश नियोजन

. रंगसंगती, स्पष्टता ठसठशीतपणा (सादरीकरण)

संकल्पचित्र

संकल्पचित्र म्हणजेच डिझाईनमध्ये परीक्षकांना काय अपेक्षित असते?

खालील बाबतीत विद्यार्थ्याची समज क्षमता

. अवकाश विभाजन

. आकार, रेषा यातील लय तोल

. पोत (texture) निर्मिती

. रंगछटा रंगसंगती
- - - - - - - - - - - - - - - - - - 

. अवकाश विभाजन

आपण चित्रात जे आकार काढतो त्या प्रत्येक आकाराच्या आत अवकाश असते आणि बाहेरही अवकाश असते. संकल्प तयार होण्यासाठी या दोन्हीही अवकाशांचे विभाजन होणे आवश्यक असते. आकारांनी व्यापलेले अवकाश याला व्याप्त अवकाश (positive space) म्हणतात तर आकारांनी व्यापलेल्या रिकाम्या जागेला अव्याप्त अवकाश (negative space) म्हणतात. एखादे चित्र जेंव्हा छान दिसते तेंव्हा त्याच्या सुंदर दिसण्यात त्यात असलेल्या अव्याप्त अवकाशाचीही महत्त्वाची भूमिका असते. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात येत नसली तरी चित्र काढणाऱ्याने हे लक्षात घ्यायचे असते. चित्रात कुठेही अवकाशाचे अतिविभाजन म्हणजे आकारांची गर्दी टाळावी त्याचप्रमाणे विभाजन झालेले अवकाश टाळावे. चित्रात वापरलेल्या आकारांपैकी एकही आकार सुटा म्हणजे इतरांपासून दूर दाखवता सर्व आकार एकमेकांकर अंशतः आच्छादित दाखवावेत. त्यामुळे चित्रात एकात्मता दिसते. उजळ आकर्षक रंग/छटा मुख्य आकारात वापरावेत. इतर म्हणजे कमी महत्त्वाचे असलेले आकार फार आकर्षक होऊ देऊ नयेत.

. आकार, रेषा यातील लय तोल

चित्रात आकार एकमेकांना साथ-संगत करणारे असावेत. परस्पर विरुद्ध दिशांनी छेद देणारे नसावेत. चित्राचे दोन किंवा अधिक  छेद करतील अशा आरपार रेषा किंवा आकार वापरू नयेत. दुय्यम महत्व असलेल्या आकारांनी  पाहणाऱ्याचे लक्ष स्वतःकडे वेधता मुख्य आकाराकडे जाईल अशा बेताने त्यांचे स्थान उजळपणा असावा. पाहणाऱ्याची नजर कुठुन कुठे फिरावी याचा विचार करून त्यानुसार आकार, त्यांचे स्थान रंगयोजना करावी

. पोतनिर्मिती

पोत हा चित्रातील महत्त्वाचा घटक आहे. रंगाप्रमाणेच पोताचे वैविध्य असल्यास चित्र खुलून दिसते. फूल किंवा पान असे आकार खडबडीत पोताच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसतात

. रंगसंगती

चित्रात निवडक रंगच वापरावेत. जास्तीत जास्त रंग वापरावेत. त्याहून जास्त रंग वापरल्यास रंगसंगती अशी काहीच राहात नाही. लक्षात ठेवा पिवळा रंग हा सर्वात आकर्षक रंग आहे. पार्श्वभूमीवर तो शुद्ध स्वरूपात कधीही वापरू नका. अन्यथा मुख्य विषयापेक्षा पार्श्वभूमी लक्षवेधी होण्याचा धोका असतो. केशरी रंगाचेही तसेच आहे. तुमच्या रंगांच्या निवडीवरून तुम्हाला रंगसंगतीचे ज्ञान आहे असे परीक्षकांना वाटले पाहिजे. त्यासाठी उष्ण रंगसंगती, शीत रंगसंगती, द्वितीय श्रेणी रंगसंगती, पूरक रंगसंगती, एक रंगसंगती, कृष्णधवल रंगसंगती यापैकी एखादी किंवा दोन रंगसंगतींची नियोजनपूर्वक सांगड घाला. प्रत्येक रंगाच्या फिकट, मध्यम गडद अशा किमान तीन छटा चित्रात असू द्या. लक्षात ठेवा फिकट म्हणजे पांढऱ्याकडे जाणाऱ्या गडद म्हणजे काळ्याकडे जाणाऱ्या छटा. काही जण गडद (dark)  याचा अर्थ उजळ असा घेतात. हे चुकीचे आहे. उदा. डार्क पिवळा याचा अर्थ पिवळा धमक नसून तपकिरी असा आहे. डार्क याचा अर्थ अंधार म्हणजे काळा असा आहे

चित्रात एकंदरित सादरीकरण हेही महत्वाचे आहे. नीटनेटकेपणा दिसला पाहिजे. त्यासाठी या विषयाला जास्त वेळ दिलेला असतो. संकल्पचित्रात संपूर्ण कागद रंगवायचा नसल्याने कागदाला चौकट आखू नये. चित्राबाहेरचा कागद स्वच्छ ठेवावा. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी. ब्रश झटकू नये. फडक्याला पुसावा. मध्य काढण्यासाठी कागदाला घडी घालू नये. मोजून मध्य काढावा. कागद बोर्ड/पॅडला चित्र पूर्ण होईपर्यंत पिना किंवा क्लिपने लावून ठेवावा. म्हणजे खराब होत नाही. रंगवताना रंगपेटी/बाटल्या, पॅलेट, पाणी, फडके हे सर्व कागदाच्या डाव्या किंवा उजव्या एकाच बाजूला ठेवावे. चित्र काढण्यात फार वेळ घालवू नये. रंगवण्यासाठी अधिक वेळ मिळेल हे पाहावे. आकारांना बाह्यरेषा काढू नयेत.


चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी नियमानुसार अधिकतम किंवा न्यूनतम वयाची अट नसते. तथापि मी इयत्ता पहिलीपासून माझ्याकडे शिकत असलेल्या मुलालासुद्धा इयत्ता ८वीत गेल्याशिवाय एलिमेंटरी ह्या पहिल्या परीक्षेला बसवत नाही. कारण  एलिमेंटरी परीक्षेत अपेक्षित असलेली कौशल्ये समज मुलांना तेंव्हाच प्राप्त होतात. त्यामुळे मुलांना अतिशय चांगले यश मिळते.

*कर्तव्य भूमिती*
(Practical geometry) 

हा विषय चित्रकलेच्या परीक्षेत का ठेवलेला आहे असा प्रश्न बरेच जण विचारतात. त्यांनी हे लक्षात घ्यायचे आहे की काटेकोरपणा, अचूकता हा चित्रकलेतील एक महत्वाचा भाग आहे. स्थिरचित्र, स्मरणचित्र संकल्पचित्र या विषयांमधून विद्यार्थ्याचे हे गुण तपासले जात नाहीत. त्यासाठी कर्तव्य भूमिती हा विषय असतो. ही कर्तव्य म्हणजे कृतीयुक्त भूमिती आहे. यात विद्यार्थ्याला केवळ भौमितिक सिद्धांत माहिती असणे इतकेच अपेक्षित नाही; तर त्या सिद्धांतांचा उपयोग व्यवहारात करता येणे अचूक आकृती काढता येणे अपेक्षित असते. उदा. तुम्हाला काटकोन किंवा लंब काढायचा असेल आणि तुम्ही तो गुण्या ( Setsquare) किंवा कोनमापक (protractor)  वापरून काढला तर तो चूक दिला जाईल. तो कम्पासने कंस करूनच काढला पाहिजे. या पद्धतीने एखाद्या भूखंडावर १०० मीटर X १०० मीटर आकाराचा चौरस सुद्धा अचूक काढता येतो

सेमी लांबीच्या रेषेचे दोन समान भाग तुम्ही जर सेंटीमीटरवर एक बिंदू काढून केलेत तर चूक दिले जाईल. कारण तुम्ही यासाठी ÷ = या गणिताचा वापर केला, भूमितीचा केला नाही

म्हणजेच यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत
. योग्य भौमितिक पद्धतीचा अवलंब.
. आकृती तंतोतंत, काटेकोर असणे.

आता परीक्षेत आकृत्या काढताना आणि सराव करतानाही कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या टाळायच्या ते पाहू.

परीक्षेत प्रश्न लिहायचा नसतो. फक्त प्रश्न क्रमांक आकृतीजवळ लिहायचा असतो.

आकृत्या काढण्यासाठी नेहमीची HB ग्रेडची पेन्सिल वापरता H किंवा 2H पेन्सिल वापरा

कंपासमध्ये घालण्यासाठी पेन्सिल अर्धी कापून घ्या. पूर्ण लांबीच्या पेन्सिलचा वर्तुळ काढताना हाताला अडथळा होतो

पेन्सिल नेहमी अणकुचीदारच वापरा.

उत्तम सराव आत्मविश्वास असल्यास सराव करताना परीक्षेतही आकृत्या जेलपेन/मायक्रोटिप पेनने करू शकता. यासाठी लाल सोडून इतर रंगाचे पेन वापरून आकृत्या अधिक आकर्षक करता येतील.

कंपासचे पोलादी टोक बारकाईने तपासून पाहावे. कम्पास हातातून खाली पडल्याने किंवा धक्का लागल्याने ते वाकडे होते. अशा कंपासने वर्तुळ किंवा कंस कधीही काढू नये. ते टोक गिरमिटावर घासून सरळ तीक्ष्ण बनवा.

प्रत्येक आकृतीत रेषा कंस काढताना दोन प्रकारच्या काढायच्या असतात. . ठळक . फिकट
प्रशनाचे उत्तर असेल तो आकार ठळक करा इतर सर्व रेषा, कंस . फिकट; पण दिसतील असे ठेवा. फिकट रेषा काढतानाच फिकट काढायच्या आहेत. आधी ठळक काढून मग खोडून फिकट करू नयेत. लक्षात ठेवा ठळक म्हणजे जाड नव्हे

*अक्षरलेखन*

कर्तव्य भूमितीच्या परीक्षेत आकृत्या काढायला सांगितलेल्या असतात. त्याच कागदावर मागच्या बाजूला अक्षरलेखनही करायचे असते. त्यामुळे अक्षरलेखन रंगविताना फक्त अक्षर रंगवावे. पार्श्वभूमी रंगवू नये. अन्यथा कागदाची मागील बाजू खराब होऊ शकते.

अक्षरलेखनासाठी सांगितलेला आकार कागदाच्या मध्यभागी काढावा. त्या आकाराच्या बाहेर अक्षराचा भाग जाता कामा नयेच पण त्याला स्पर्शही होता कामा नये. चारी बाजूंनी किमान अर्धा सेंटीमीटर इतका समास सोडावा.
(इंटर्मिजीएट परीक्षेत कागदाच्या मागील बाजूस दोन प्रश्न सोडवायचे असतात. अक्षरलेखन घनभूमिती. यासाठी कागद उभा धरून कागदाच्या वरील अर्ध्या भागात अक्षरलेखन खालील अर्ध्या भागात घनभूमिती करावी.)

अक्षराचा आकार, प्रकार, रंग हे त्या शब्दाच्या अर्थाला साजेसे , प्रमाणबद्ध सुंदर दिसेल असे असावे. लक्षात असूद्या की या प्रश्नातून आपली अक्षरलेखनाची समज क्षमता बघितली जाणार आहे. चित्रकलेची नव्हे. अक्षराला अतिशय थोडा पण अर्थपूर्ण असा चित्रकार तुम्ही जोडू शकता. पण हे करताना अक्षर वाचण्यात अडथळा येण्याचा धोका असतो. तो कौशल्याने टाळावा; अन्यथा अक्षराला कोणताही चित्राकार जोडणे किंवा अक्षरासोबत कोणतेही चित्र काढणे उत्तम.

अक्षरलेखनासाठी प्रश्नपत्रिकेत दिलेला शब्द ऱ्हस्व-दीर्घ/स्पेलिंग चूक करता लिहायचा आहे. हा शब्द देवनागरी रोमन लिपीत दिलेला असतो. कोणत्याही लिपीत आपण काढू शकतो.

पाचपैकी कोणत्याही चार आकृत्या काढा म्हटलेले असले तरी सर्व पाच आकृत्या काढा. म्हणजे त्यातील सर्वोत्तम चार आकृत्यांचे गुण विचारात घेतले जातील

ही कर्तव्य भूमिती असल्याने शाळेत शिकवल्या जाणाऱ्या भूमितीप्रमाणे येथे रेषांना बाण काढायचे नसतात

*सादरीकरण*

तुम्ही काढलेल्या आकृत्यांच्या सादरीकरणालाही महत्त्व दिले जाते
त्यासाठी पाच आकृत्यांपैकी आकाराने सर्वात मोठी असलेली आकृती प्रथम कागदाच्या मध्यभागी काढा. इतर चार आकृत्या तिच्या चार बाजूंना एक एक अशा बसवा. आकृत्यांचा आकार कागदावर मावेल अशा बेतानेच दिलेला असतो. त्यामुळे त्यात काहीही बदल करू नका

सर्व प्रश्न प्रथम नीट वाचा. प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी उर्दू या चारही भाषांमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला एका भाषेतून अर्थ नीट समजल्यास दुसऱ्या भाषेचा आधार घ्या; पर्यवेक्षकांना शक्यतो काहीही विचारू नका. त्यांना यातील काहीही माहिती नसते.

इंटरमीजीएट परीक्षेत आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे घनभूमितीचा

*घनभूमिती*

. घन 
(cube)

. चतुष्कोनाकृती घन 
(square prism)

. सूची 
(pyramid)

. दंडगोल 
(cylinder)

.शंकू 
(cone)

. गोल 
(sphere)

या मूलभूत भौमितिक घनाकारांपैकी कोणत्याही एकाचे प्रश्नात वर्णन केलेले असते. त्याप्रमाणे त्या घनाकाराचे अनुविक्षेप (plan) दोन उद्विक्षेप (elevations) योग्य पद्धतीने काढायचे असतात.

- उन्मेष इनामदार
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#कारागिरी


माझ्या विद्यार्थ्यांनी काढलेली काही चित्रे 

























1 comment:

  1. khoopach chhan mahiti aahe sir. sir apla mobole number nilel ka. maza number 9271441193 asa aahe. tumcyashi bolayche aahe

    ReplyDelete